"गुंदूळ" or 'Goondool' literally translates into mesmerizing chaos. An outcome of visual research, interviews, and writing by the galli's young residents – in collaboration with an anthropologist and a designer – ‘Goondool’ seeks to showcase spaces and lives which are rarely perceived in the dominant imagination as Pune or Puneri.


The People

The narrow alleys of Ganj Peth are a beehive. Bidis, receipt books, tin trunks, wooden toys, garlands and veni, shirts and school uniforms, khari, and rusk are all born in its nooks and dingy one-room- establishments. These nooks remain unacknowledged, the traces of Ganj Peth on these objects fading as they travel farther away to other gallis and small shops in the city. Day after day, the inhabitants of Ganj Peth sweep, stitch, string, bake, hammer, and cut metal, wood, and cloth to keep the city running.

संजयभाऊ  बुधवार पेठ (रेड लाईट एरिया) येथे गजरे विकण्यास जातात. सायंकाळी ६ च्या पुढे त्यांची गजरे विकण्याची वेळ असते. विशेष म्हणजे ते खूप वर्षांपासून तेथे विकायला जातात आणि तेथील बायका त्यांना भाऊ दादा असे म्हणून हाकत मारतात. ते म्हणतात, ‘‘अरे त्या बायकांनाही माणुसकी आणि महत्वाचे म्हणजे मन हे आहे हे कळते.’’ ते या गल्लीत विकायला जातात म्हणून त्यांजकडे जरा वेगळया नजरेनेही पाहिले जाते आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.संजयभाऊ त्यांचे बांधलेले गजरे आधी टोकरीत ठेऊन एअर कंडीशनसाठी पाठवात. ते गजरे जणू काय बर्फाची चादरच अंथरल्यासारखे दिसत होते आणि गजऱ्यातील पाणी झटकताना फुले खाली पडत होती.म्हणजे एकूणच फुले आज देवापासून धार्मिक ठिकाणी आणि तेथून ‘ती गल्ली’ असा फुलांचा प्रवास होताना दिसून आला व तो मनाला एक वेगळीच कलाटणी देणारा दिसून येतो. म्हणूनच फुले मला आदर्श वाटतात.


झाडु कामगारांची दिनचर्या पहाटे ६ वा जल्या पासून दुपारी २ पर्यंत चालू असते. त्यांच्या कामातले तीन महत्वाचे शब्द म्हणजे: कोठी, हजेरी, हद्द. गंजपेठेतील झाडु कामगारांना पहाटे कामावर जायची घाई असते. अंघोळ करून निघण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून इथे चुली पेटवलेल्या असतात. ही आरोग्य कोठी खजिना विहीर म्हणजेच भिकारदास मारुती मंडळा जवळ येथील आहे. झाडु कामगारांना आपल्या कामाची सुरुवात इथुनच करावी लागते. कामगार जमा झाल्यावर त्यांच्या जो मुकादम म्हणजेच सुपरवायझर असतो तो या कोठीत कामगारांची हजेरी लावतो. थोडा जरी उशीर झाल्यास गैरहजेरी लावली जाते. काही कार्यक्रम असेल तर कोठीतच सर्व कामगार गोळा होऊन ते सण साजरे करतात. १० वाजेपर्यंत त्याचे काम आटपुन मुकादम म्हणतील त्या दुसर्या हद्दीत जाऊन थोडेफार काम करावे लागतेच. हे काम १२.३० पर्यंत पूर्ण करून दुपारी १.३० च्या हजेरीला पुन्हा एकदा कोठीवर जायला लागते. इथे आल्यानंतर सगळे स्त्री/पुरुष कामगार एकत्र येतात आणि कामाच्या ठिकाणीचे अनुभव व विनोद अशा वेगवेगळया गप्पांनी कोठी रंगलेली असते. अशी ही कोठी झाडु कामगारांच्या आयुष्यातील दुसरी शाळाच होय. दुपारी २ नंतर पुढे सगळेजण आपआपल्या मार्गावर निघतात.


गंज पेठेतील रहिवासी मी शिवलाल रामचंद्र नागपुरे. माझे लहानपण येथेच गेले आहे. माझे शिक्षण ८ वी पर्यंत झाले आहे. पशुपालन हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. हा गोठा बांधुन मला ६०-७० वर्षे झाले आहेत. आधी माझ्या गोठ्यामध्ये गायी, बकऱ्यांचा कळप, दोन बैल गाड्या होत्या. आम्ही आधी गायीला चारा मार्केटयार्ड मधुन आणायचो पण आता माझा मुलगा मासेआळीमधुन भाजी विकणारे यांच्या हाताखाली काम करतो. ते भाजीवाले राहिलेले भाजी त्यांना तसाच देतात. माझ्या वयाप्रमाणे मला आता काम जमत नाही. म्हणून (चंद्रकांत शिवलाल नागपुरे) हा गाईचा गोठा सांभाळतो. सनवारीच्या दिवशी लोक शेन घेण्यासाठी येतात. एक म्हणजे गणेश उत्सव, दसरा दिवाळी, कोजीगिरी पौर्णिमा या सणच्या दिवशी शेणाची मागणी भरपूर केली जाते. महत्वाचे म्हणजे महात्मा फुले वाडेला पुर्ण सारवण्यासाठी आमच्याकडुनच शेण घेतले जाते. ३०-४० बादलीचे शेण त्या वाड्यात दिले जाते. एका बादलीमागे १५-२० रू. असे घेतले जातात.

अन्नपूर्णा श्रीकांत चिटमल वयाच्या १४ व्या वर्षांपासून येथे काम करते. अन्नपूर्णा चिटमल दरमहा ८ हजार पगारावर काम करते. दरवर्षी दिपावली सणाला त्यांना बोनस मिळतो. कंपनीत पगारीवर १० % वाढ इतका मोबदला मिळतो आणि दर ३ वर्षांनी पेमेंट मध्ये वाढ होते; १० वर्षे पूर्ण नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतर पेन्शन लागू होते. “मी माझ्या घरातील आर्थिक परिस्थितीला सामोरे जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला”. सध्या अन्नपूर्णाचे लग्न झालेले असून तरीही त्या तिथेच कंपनीत कार्यरत आहे. पण आरोग्यविषयक समस्यादेखील उद्भवतात. “तरी देखील नाईलाजास्तव काम करावे लागते. माझ्या कुटुंबातील सदस्यांचा देखील पाठींबा आहे” असंही त्यांनी सांगितलं.


सर्वांत प्रथम एका टेंबुरचे पान घेऊन त्यावर पत्रा ठेवून त्या पत्राच्या आकाराचे पान कापले जाते. एका पानामध्ये तीन काप निघतात. त्यापैकी एक पान घेऊन त्या पानात तंबाकु भरून दोन हातांच्या बोटांच्या सह्याने त्या पानाला गोल गोल रोल करून त्याची पुढची एक टोक बोटाने किंवा काठीने बंद केली जाते आणि मागची टोक चपटी करून त्याला दोरीने बांधली जाते. अश्या एका बंडलमध्ये २५ बिड्या असतात. असेच २८ बंडल करून बिडी करणाऱ्या महिला सकाळी १२च्या आत कारखान्यामध्ये घेऊन जातात. मग कारखान्येवाले मालक त्यांना ११० रूपये मजुरी देतात. गंजपेठेत बरेच ठिकाणी महिला जास्त प्रमाणात बिडी बनवतात.


बालगंधर्व येथे काँग्रेस भवन त्या ठिकाणी रविवारी सकाळी १० वाजता कबुतरांचा बाजार भरतो. ५०० ते १२००० हजार अशी कबुतरांची किंमत आहे. त्यांना लाकडाची अशी मोठी व रुंद कपाटासारखे घर बांधतात. त्यात छोटे छोटे कप्पे असतात. त्यामधे जोडी-जोडी कबुतर ठेवतात. त्या लाकडी कपाटाला ढाबळ असे म्हणतात.यांना दोन टाईम म्हणजे सकाळी ११ वाजता, संध्याकाळी ५ वाजता ढाबळीतुन बाहेर काढतात. आंघोळीसाठी एका मोठ्या पाटीत पाणी भरून ठेवतात. त्यांचे खाद्ये :- गहु, ज्वारी, बाजरी, भात टाकतात.


मार्केटयार्ड येथे फुले मिळतात तिथे वेगवेगळया प्रकारची, रंगाची फुले मिळतात व ती अनेक वेगवेगळया ठिकाणाहून म्हणजे बंगलोर इ. वरून पुण्यात आणली जातात व मार्केटयार्ड मध्ये विकली जातात. वेणी बनवताना सुत, आडे, चमकी, पेचक, पितळ, पान, आकडी इ. साहित्य वापरतात.सझनला आम्ही घरातील १५-२० किलो फुले घरातच बांधतो. घरातील सर्व मिळून वेणी बांधत असताना अनेक गप्पा, गोष्टी, गाणी, गॉसीप असे अनेक विचार चालतात. बांधत असताना खुपच मज्जा येते व बोलत बोलत फुले कधी संपतात याचं भान रहात नाही. एका डझनामागे ३०/- रू. मिळतात. या वेण्या करत असताना आरोग्यविषयक समस्याही उद्‌भवतात पण मिळून-मिसळून एकत्र केल्याने त्या त्रासाचा थांगपत्ताही लागत नाही आणि त्या गोष्टीचा विसर पडतो आणि बघत बघत वेणी तयार होते.

अविदाबार्इंनी घरी येऊन फुलांची वाटणी केली. ठिकठिकाणी बांधण्यास दिली आणि स्वतःसाठी बांधण्यास थोडी ठेवली. वेण्या बांधून झाल्यानंतर अविदाबाई संध्याकाळी ७ वाजता जवळच्या माशे आळीत जाऊन त्या विकायला बसतात. साडे नऊ पर्यंत घरी येतात. सनासुदीच्या वेळेस मंडई, भवानी पेठेतलं भवानी माता मंदिर अशी लांबची फेरी त्या करतात. कधी तब्येत बरी नसली तरी गोळ्या खाऊन काढतात, पण फुलाचं काम चुकवत नाहीत.


माझे नाव मतीन बादशाहा शेख. पुण्यात गंजपेठ या ठिकाणी माझे बालपन गेले आणि गंजपेठेमध्ये मिठ्ठपल्ली वाडा या ठिकाणी मी आता राहतो. सरस्वती मंदिर या प्रशालेत माझे १० पर्यंतचे शिक्षण झाले. ८ वर्षाचा असताना मी माशे आळीमध्ये राममंदिरासमोर दुसऱ्यांनी बनवलेले लाकडी खेळणी घेऊन ती खेळणी विकण्यासाठी खाली रस्त्यावर बसायचो. मग ती वस्तु कशा प्रकारे बनवतात, काय काय वस्तु बनवतात त्यांचे निरिक्षण करू लागलो. मग १८ वर्षांचा झाल्यावर मी स्वतःचे लाकडी खेळणी बनवण्याचे दुकान टाकले. आज माझ्या दुकानाला १२ वर्षे पुर्ण झाले. माझ्या दुकानात, ड्रिलमशीन, हॅन्डकटर, जिकजॅक मशीन, हातोडी, अंबुर या सर्व प्रकारच्या मशीन आहेत. माझ्या कामाचे मटेरियल मी टिंबर मार्केट या ठिकाणाहून मी घेतो. लाकडाचा मेन व्यापार पुण्यात बौदान या ठिकाणी केला जातो. सर्व लाकडी व्यवसाय करणारे याच ठिकाणाहून लाकडाची आयात करतात. लाकडांच प्रकार असतात जसे की, सागवान, देवदार, पाईनवुड, प्लायवुड, जंगली, कमरशील प्लायवुड इ. माझ्या दुकानात २ कामगार आहेत. सिजनमध्ये मला कामाचा जास्त लोड पडतो. सिजन मध्ये म्हणजे लग्नासराईच्या वेळी मला रूखवताच्या भरपुर ऑर्डर असतात. लग्नसराईच्या वेळी मी लहान खेळणी, पोलपाट, लाटणं, बैलगाडी, प्राणी, सोपा सेट, ड्रेसिंग टेबल, बेड अश्या लाकडापासून छोट्या वस्तु बनवतो. लोकांना मी बनवलेल्या गोष्टी आवडतात. शेतकी कॉलेज, बालगंधर्व या ठिकाणी माझ्या वस्तुचे प्रदर्शन केले जाते. कँप, एम. जी. रोड. अश्या अनेक ठिकाणी माझ्या वस्तु विकल्या जातात. गोवा, पंजी, बेंगलोर, दिल्ली, कोरेगाव पार्क या ठिकाणी विकल्या जातात. मशीनवर काम करताना पाठ दुखते. हात दुखतात. मशीनच्या आवाजाने कधी कधी डोके दुखते. मला आर्किटेक बनायचे होते पण नाही बनलो. पण आर्किटेक ज्या ज्या वस्तु बनवु शकतात त्या वस्तु मीही बनवु शकतो.


1. त्या भट्टीमध्ये सगळयात खालचा पातळीवर कोळशांच्या थर हंतरलेला होता. 2. मग बिडी ठेवण्याआधी १०-१५ मिनिटे ती भट्टी तशीच रिकामी ठेवली जाते आणि मग नंतर एकावर एक चाळणीचे घर मांडले जाते आणि तो ठेवल्यानंतर जातीने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. एका भट्टीमध्ये ५-१० चाळण्या ठेवले जातात आणि एका चाळणीत ४०० बिड्या ठेवले जातात. 3. ते भाजताना त्यांच्या बोटांना चटके बसतात. त्या बिड्या भाजण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण असे आहे की, पाण्याचे अंश पूर्णपणे जाण्यासाठी त्या बिड्यांना हलकेफुलके भाजले जाते. अश्या प्रकारे बिड्याचे भट्टीची प्रक्रीया पूर्ण होते. 4. कारखान्यातील विड्या भाजणी नंतर शेवटी पॅकिंग करण्यासाठी त्यांच्याकडे गठ्ठे दिले जाते. आणि मग ही पॅकिंग एका विशिष्ट ब्लॉकमध्ये केली जाते. ती ब्लॉकवर म्हणजेच कागदावर त्याच्या स्वतःचे नाव आहे. तो कागद त्यांनी बाजारभावातून होलसेल मधुन घेतात. बुधवार पेठ, भोरी आळी या ठिकाणी ब्लॉकचे दुकान आहे आणि ते अश्या मोठ्या कारखान्याचे ऑर्डर घेतात. रेट नुसार देतात. विडीची पॅकिंग झाल्यावर ते वेगवेगळया दुकानांत सप्लाय करतात.


The Food

The range of eateries in the alleys of Ganj Peth reflects the cosmopolitan mix of communities that make up the eastern part of the city: Telugu-speaking Padmashalis, Matang community from Solapur, Muslims in Mominpura and so on. Navigate the radically different “food map” of the city in the following panels and see where it takes you!


Spoken words

There are 26 alphabets unique to the language of Ganj Peth. The audio segment of the exhibition presents the community’s language via pronunciation of these letters, their sounds, and usage in sentences.


The Team

This project and exhibition were supported by the “Engaged Anthropologist Grant” sponsored by the Wenner Gren Foundation, New York.

©2008-2022 Inhouse Design™

Let's be friends Fb. – In.

Privacy Preference Center