Multimedia Exhibtion
संजयभाऊ बुधवार पेठ (रेड लाईट एरिया) येथे गजरे विकण्यास जातात. सायंकाळी ६ च्या पुढे त्यांची गजरे विकण्याची वेळ असते. विशेष म्हणजे ते खूप वर्षांपासून तेथे विकायला जातात आणि तेथील बायका त्यांना भाऊ दादा असे म्हणून हाकत मारतात. ते म्हणतात, ‘‘अरे त्या बायकांनाही माणुसकी आणि महत्वाचे म्हणजे मन हे आहे हे कळते.’’ ते या गल्लीत विकायला जातात म्हणून त्यांजकडे जरा वेगळया नजरेनेही पाहिले जाते आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
संजयभाऊ त्यांचे बांधलेले गजरे आधी टोकरीत ठेऊन एअर कंडीशनसाठी पाठवात. ते गजरे जणू काय बर्फाची चादरच अंथरल्यासारखे दिसत होते आणि गजऱ्यातील पाणी झटकताना फुले खाली पडत होती.म्हणजे एकूणच फुले आज देवापासून धार्मिक ठिकाणी आणि तेथून ‘ती गल्ली’ असा फुलांचा प्रवास होताना दिसून आला व तो मनाला एक वेगळीच कलाटणी देणारा दिसून येतो. म्हणूनच फुले मला आदर्श वाटतात.मार्केटयार्ड येथे फुले मिळतात तिथे वेगवेगळया प्रकारची, रंगाची फुले मिळतात व ती अनेक वेगवेगळया ठिकाणाहून म्हणजे बंगलोर इ. वरून पुण्यात आणली जातात व मार्केटयार्ड मध्ये विकली जातात. वेणी बनवताना सुत, आडे, चमकी, पेचक, पितळ, पान, आकडी इ. साहित्य वापरतात.सझनला आम्ही घरातील १५-२० किलो फुले घरातच बांधतो. घरातील सर्व मिळून वेणी बांधत असताना अनेक गप्पा, गोष्टी, गाणी, गॉसीप असे अनेक विचार चालतात. बांधत असताना खुपच मज्जा येते व बोलत बोलत फुले कधी संपतात याचं भान रहात नाही. एका डझनामागे ३०/- रू. मिळतात. या वेण्या करत असताना आरोग्यविषयक समस्याही उद्भवतात पण मिळून-मिसळून एकत्र केल्याने त्या त्रासाचा थांगपत्ताही लागत नाही आणि त्या गोष्टीचा विसर पडतो आणि बघत बघत वेणी तयार होते.
अविदाबार्इंनी घरी येऊन फुलांची वाटणी केली. ठिकठिकाणी बांधण्यास दिली आणि स्वतःसाठी बांधण्यास थोडी ठेवली. वेण्या बांधून झाल्यानंतर अविदाबाई संध्याकाळी ७ वाजता जवळच्या माशे आळीत जाऊन त्या विकायला बसतात. साडे नऊ पर्यंत घरी येतात. सनासुदीच्या वेळेस मंडई, भवानी पेठेतलं भवानी माता मंदिर अशी लांबची फेरी त्या करतात. कधी तब्येत बरी नसली तरी गोळ्या खाऊन काढतात, पण फुलाचं काम चुकवत नाहीत.